शिवसेनेचे विदर्भ समन्वयक आणि उपनेते (शिंदे गट) नरेंद्र भोंडेकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. या संदर्भात त्यानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून राजीनामा दिल्याची माहिती दिली. भोंडेकर यांच्या राजीनाम्यामागचे मुख्य कारण म्हणजे त्यांचा नव्या मंत्रिमंडळात समावेश न होणे हेच मानले जात आहे. याच कारणास्तव त्यानी राजीनामा दिल्याचे बोलले जात आहे. ते काही काळापासून संतप्त होते.