भीमा नदीत कुटुंबाने केलेल्या सामूहिक आत्महत्येचे कारण उलगडले

बुधवार, 25 जानेवारी 2023 (14:49 IST)
पारनेर तालुक्याच्या निघोज येथील कुटुंबाने दौंडच्या भीमा नदीत 17 जानेवारीच्या रात्री 7 जणांनी आत्महत्या केली. एकाच कुटुंबातील पती, पत्नी, मुलगी, जावई आणि  त्यांच्या 3 मुलींनी भीमा नदीपात्रात उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. कुटुंबाने सामूहिक आत्महत्या केल्याचे कारण समोर आले आहे. 
कुटुंबातील प्रमुखाच्या मुलाने नात्यातील मुलगी पळवून आणली होती. त्याचा राग मुलाच्या वडिलांना आला आणि कुटुंबातील 7 जणांनी बदनामी होण्याच्या भीतीपोटी सामूहिक आत्महत्या केली. 

वृत्तानुसार, निघोज गावातील मोहन पवार यांचा धाकटा मुलगा अनिल पवार (२०)याने आपल्या नात्यातील एका मुलीला १७ जानेवरी रोजी पळवून नेले होते. त्यावरून मोहन पवार यांनी मोठ्या मुलाला राहुल पवार याला तुझ्या धाकट्या भावाने मुलगी पळवून नेली आहे, त्यामुळे त्याला मुलीला परत आणायला सांग अन्यथा आम्ही कुटुंबासह विष घेऊन आत्महत्या करू. नंतर त्यारात्री मोहन यांनी समाजात बदनामी होईल या भीतीपोटी कुटुंबासह वाहनाने गावातून निघाले आणि शिरूर -चौफुला मार्गावर दौंड तालुक्यात पारगाव हद्दीत भीमा नदीच्या पात्रात कुटुंबासह उडी घेऊन आत्महत्या केली. कुटुंबातील चार जणांचे मृतदेह आढळले. तर १८ जानेवरी रोजी एका महिलेचा मृतदेह आढळून आला. नंतर 20,21,22 जानेवारी रोजी तीन अजून मृतदेह आढळून आले. मोहन उत्तम पवार, संगीता मोहन पवार, राणी शाम फुलवरे, शाम फुलवरे अशी मयत व्यक्तींची नावे आहेत. पोलीस प्रकरणाचा अधिक तपास करत आहे. 
 
Edited By- Priya Dixit 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती