परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी बुधवारी सामान्य प्रवाशाप्रमाणे अॅपवर बाईक बुक केली. या स्टिंग ऑपरेशनद्वारे त्यांनी या सेवेतील त्रुटी आणि बेकायदेशीर स्वरूप उघड केले.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्वतः सामान्य प्रवाशाप्रमाणे अॅपवर बाईक बुक केली. या स्टिंग ऑपरेशनद्वारे त्यांनी या सेवेतील त्रुटी आणि बेकायदेशीर स्वरूप उघड केले. प्रवाशांच्या सुरक्षिततेला कोणताही धोका निर्माण होऊ नये आणि नियमांचे उल्लंघन होऊ नये यासाठी ही कारवाई करण्यात आल्याचे बोलले जात आहे. कंपन्यांना अॅपमधून बाईक टॅक्सीचा पर्याय तात्काळ काढून टाकण्याच्या सूचना देण्यात आल्या.