मिळालेल्या माहितीनुसार नागपुरातील गणेशपेठ कॉलनी परिसरातील हॉटेल द्वारकामाईमध्ये बॉम्ब ठेवण्याची धमकी मिळाली आहे. हॉटेलला मेलद्वारे ही धमकी मिळाली आहे. याबाबतची माहिती मिळताच बॉम्बशोधक पथक आणि पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले असून तपास सुरू आहे. तसेच नागपूरचे पोलिस डीसीपी राहुल माकणीकर म्हणाले की, “नागपूरच्या गणेशपेठ कॉलनी भागातील हॉटेल द्वारकामाईमध्ये बॉम्बची धमकी देणारा मेल आला आहे. पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि आम्ही सर्व लोकांना बाहेर काढले. बॉम्ब शोधक पथकाने कसून शोध घेतला असता आम्हाला काहीही संशयास्पद आढळले नाही. "पुढील तपास सुरू आहे."