बगीरा अर्थात ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात पुन्हा एकदा काळ्या बिबट्याचे दर्शन

सोमवार, 4 मार्च 2019 (14:03 IST)
चंद्रपूर जिल्ह्यातील प्रसिद्ध असेलेल्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात परत एकदा बगीरा अर्थात काळ्या बिबट्याचे दर्शन झाले, रविवारी जागतिक वन्यजीव संरक्षण दिन होता त्याच दिवशी प्रकल्पातील कोळसा भागात या बिबट्याने दर्शन दिले आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील पट्टेदार वाघांसह हा काळा बिबट्या नवे आकर्षण ठरला असून त्यामुळे आता पर्यटक सुद्धा वाढतील असा अंदाज आहे. या बिबट्याचे जनुकीय बदलाने असे रूप घेतलेल्या डौलदार चालीच्या काळ्या बिबट्याच्या दर्शन होत असून त्यामुळे पर्यटक खुश झाले आहेत. सध्या या बिबट्याचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. प्रसिद्ध चित्रपट असलेला जंगल बूक सिनेमात मोगलीचा मित्र म्हणून काळा  बिबट्या पाहायला मिळाला होता. आता तसाच बगिरा चंद्रपूरच्या व्याघ्र प्रकल्पात पाहायला मिळाल्याने प्राणीप्रेमींमध्ये फार उत्सुकता आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती