नवी मुंबईत उद्घाटन सोहळ्यावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यात झालेल्या वाद विकोपाला गेला आहे. या राड्यात राष्ट्रवादीचे आमदार संदीप नाईक गाडीतून जात असताना त्यांच्या गाडीवर लोखंडी रॉड, कैचीने हल्ला केला होता. या प्रकरणी दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात आल्याने विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे, आमदार संदीप नाईक यांनी पोलीस आयुक्त संजय कुमार यांची भेट घेत शिवसेना नगरसेवकांना अटक करण्याची मागणी केली.
पोलिसांनी सत्ताधारी शिवसेनेच्या दबावाखाली येत शहरातील वातावरण खराब करणाऱ्यांना पाठिंबा दिला असून पोलीस त्यांचे हुजरे झाल्याचा गंभीर आरोप धनंजय मुंडे यांनी केला आहे. हा हल्ला शिवसेना नगरसेवक करण मढवी यांनी आपल्या कार्यकर्त्यांकरवी केला असल्याचा गंभीर आरोप संदीप नाईक यांनी केला आहे. रबाले पोलीस ठाण्यात शनिवारी शिवसेना नगरसेवक एम के मढवी, नगरसेवक करण मढवी, नगरसेविका विनया मढवी, इतर तीन जणांवर गुन्हे दाखल केले होते. मात्र हे गुन्हे मागे घेण्यात आल्याने विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे, आमदार संदीप नाईक यांनी पोलीस आयुक्त संजय कुमार यांची भेट घेत शिवसेना नगरसेवकांना अटक करण्याची मागणी केली.