लोकसभा निवडणुकीपासून धडा घेत महाराष्ट्र भाजप आता विधानसभा निवडणुकीबाबत सावध झाला आहे. शुक्रवारी मुंबई भाजप कार्यालय वसंत स्मृती येथे पक्षाने लोकसभा निवडणुकीबाबत मंथन बैठक घेतली. या बैठकीत शिंदे यांच्या शिवसेनेशी युती करत विधानसभा निवडणूक लढवतभाजपने राज्यात एकहाती 157 जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे.भाजप राष्ट्र्वादीसोबतची युती तोडून विधानसभेची निवडणूक शिंदेच्या शिवसेनेसोबत लढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. खरं तर संघाला भाजपने अजितपवार गटाशी हातमिळवणी करण्याचा निर्णय पटला नाही. शिवाय अजित पवारांचा सिंचन आणि राज्य सहकारी बँकेतील घोटाळा प्रकरणात संबंध असणे याला संघ भाजप पवार विरोधी आहे. हे सर्व असून देखील अजित पवारांच्या गटाशी युती करणे संघाला पटले नाही.
पक्षाच्या मंथन बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत पक्षाने 125 जागांवर आघाडी घेतली आहे, तर 25 हून अधिक विधानसभा जागांवर झालेल्या चुरशीच्या लढतीत आपण एकाने मागे आहोत.नव्या रणनीतीनुसार या जागांवर पुढे गेल्यास 157 जागा सहज जिंकता येतील.अजित पवारांशी युती तोडल्या बाबतचा निर्णय भाजपला विचारपूर्वक घ्यावा लागणार आहे.विधानसभेत पुढे काय होते हे पाहावे लागणार आहे.