त्या पिक अप वाहनाला रस्त्यावरच पकडले. त्यानंतर अतिशय़ धक्कादायक बाब समोर आली. त्या पिकअप वाहनातून अवैधरीत्या गोवंश वाहतूक केली जात असल्याचे निष्पन्न झाले. ही बाब बेकायदेशीर असल्याचे लक्षात येताच मंत्री भुसे यांनी हे वाहन पोलिसांच्या ताब्यात दिले. दरम्यान, पालकमंत्री दादा भुसे हे ग्रामीण भागाच्या दौऱ्यावर होते. त्याचवेळी हा प्रकार घडला. दरम्यान, या घटनेमुळे अवैध गोवंश वाहतूकीचा प्रश्न पुन्हा एकदा उघडकीस आली आहे. याबाबतचा व्हिडिओ समाज माध्यमातून व्हायरल झाला आहे.