बँकेतून कर्ज घेण्यासाठी काही जण आपले दागिने गहाण ठेवतात, तर काही जण घर, शेत गहाण ठरवतात. पण कर्जासाठी आरोग्य केंद्राची इमारत बँकेत गहाण ठेवल्याची धक्कादायक माहिती हिंगोली जिल्ह्यातील डोंगरकडा येथून मिळाली आहे. शेतकऱ्याकडून आरोग्यकेंद्रासाठी घेतलेली जमिनीवर शेतकऱ्याने बँकेच्या कर्मचाऱ्याला धरून पाच लाखाचे कर्ज घेतले आहे.
मुख्य म्हणजे या प्रकरणात अधिकारी किंवा बँकेच्या कर्मचाऱ्यांनी कोणतीही कागदपत्रांची पाहणी न करता कर्ज प्रकरणे मंजूर कसे केले या कडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. आता या प्रकरणात लवकरात लवकर काय कारवाई करण्यात येते या कडे लक्ष लागले आहे. बँकेची दिशाभूल करून संधीचा फायदा घेणाऱ्या या शेतकऱ्यावर कोणती कारवाई केली जाणार आणि तसेच या प्रकरणात बँकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर सर्वांचे लक्ष वेधले असून त्यांच्या कामावर शंका निर्माण झाली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राची ही इमारत कर्जासाठी गहाण ठेवल्याने गावात ही चर्चा रंगली आहे.