Ashti : आईनेच लावले 11 वर्षाच्या मुलीचे 13 वर्षाच्या मुलाशी लग्न, गुन्हा दाखल

शनिवार, 4 नोव्हेंबर 2023 (15:45 IST)
सरकारने बाल विवाह रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक कडक कायदे केले आहे. बालविवाह हे देशात प्रतिबंधात्मक आहे. तरीही बालविवाह केले जाते. असेच एक बालविवाह आष्टी तालुक्यात झाले आहे. 
आष्टी तालुक्यात एका गावात 19 ऑक्टोबर रोजी एका महिलेने आपल्या मुलीचा विवाह करमाळा तालुक्यात देवकाळीतील  एका 13 वर्षाच्या मुलासोबत लावण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

आईने मुलीचे लग्न लावून दिल्यावर मुलीच्या वडिलांनी आष्टी पोलीस ठाण्यात अल्पवयीन लग्न केल्याची तक्रार नोंदवली .फिर्यादी ग्रामसेवक बापू कुंडलिक नेटके यांच्या फिर्यादीवरून 2 नोव्हेंबर रोजी सुशीला एकनाथ पवार, गौतम रघुनाथ काळे, माया गौतम काळे आणि राधा गौतम काळे यांच्यावर गुन्हा नोंदवला आहे. 

या प्रकाराची माहिती मिळतातच बालहक्क समितीचे अध्यक्ष आणि कार्यकर्त्याने पुढाकार घेऊन अल्पवयीन नवरी ला बीडच्या बालगृहात दाखल केले. या प्रकरणी चौघांवर आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. 
 


Edited by - Priya Dixit 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती