अशोक चव्हाण : 'भाजपला आरक्षणाची पद्धतच संपवायची आहे'

रविवार, 27 जून 2021 (18:04 IST)
भारतातील आरक्षणाची पद्धतच भाजपला संपवायची आहे,अशी टीका महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी केली
 
ओबीसींचं राजकीय आरक्षण महाविकास आघाडीमुळे संपुष्टात आल्याचं म्हणत भाजपनं राज्यभर चक्काजाम आंदोलन केलं.या आंदोलनावर अशोक चव्हाण यांनी नांदेडमध्ये बोलताना टीका केली.

एकीकडे भाजपचं आंदोलन सुरू असताना, दुसरीकडे ओबीसी आरक्षणाच्याच मुद्द्यावरून काँग्रेसनं केंद्र सरकारविरोधात आंदोलन सुरू केलं आहे.
 
यावेळी अशोक चव्हाण यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील कारवाईचाही निषेध केला. "अनिल देशमुखांवरील ईडीची कारवाई म्हणजे राजकीय सूडबुद्धीची कारवाई आहे," असं चव्हाण म्हणाले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती