अन्वय नाईक आत्महत्येप्रकरणी अर्णब गोस्वामी हे सध्या तुरुंगात आहेत. या मुद्यावर राज्यात राजकीय वातावरण तापलं आहे. अशा वेळी अन्वय नाईक यांची पत्नी अक्षता नाईक आणि मुलगी आज्ञा नाईक यांनी मराठी माणसांना भावनिक आवाहन केलं आहे. हे भावनिक आवाहन करताना अक्षता नाईक म्हणाल्या, सत्य आपोआप बाहेर पडतं, सत्याचा विजय होतो. सत्यासाठी उभे राहा, मराठी माणसांनी पाठीमागे उभे राहावे, असं आवाहन अक्षता नाईक यांनी केलं आहे.