ठाण्यातुन एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. औषधांच्या ओव्हर डोसमुळे ८ महिन्यांच्या बाळाचा मृत्यू झाला आहे. शवविच्छेदन नको म्हणून आपल्या ८ महिन्याच्या बाळाचा मृतदेह घेऊन वडिलांनी पोबारा केला आहे. या घटनेनंतर रुग्णालयात एकाच खळबळ उडाली होती. तर या प्रकारची माहिती तात्काळ रुग्णालय प्रशासनाकडून पोलिसांना देण्यात आली आहे. पोलिसांनी मुलाच्या वडिलांना ताब्यात घेण्यात आले आहे.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, ही धक्कादायक घटना गुरूवारी (१४ सप्टेंबर) रोजी रात्री १०:३० च्या सुमारास घडली आहे. हि घटना ठाण्यातील पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात घडली. ८ महिन्याच्या बाळाला उपचारासाठी रुग्णालयात आणण्यात आले होते. मात्र आज पहाटे च्या सुमारास उपचारा करत असताना या बाळाचा मृत्यू झाला. या बाळाला जेव्हा रुग्णालयात आणले होते त्या वेळी निमोनिया आणि खोकल्याच्या औषधाचा ओव्हर डोस दिल्याचे आढळून आले होते.
दरम्यान बाळाचा मृत्यू झाल्यानंतर शव विच्छेदन करावे लागेल असे डॉक्टरांनी सांगितल्यानंतर बाळाच्या वडिलांनी त्यास विरोध केला आणि वार्डमधून आपल्या बाळाचा मृतदेह घेऊन सरळ पसार झाला. ही घटना घडल्यानंतर रुग्णालयात एकच गोंधळ झाला. याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून तात्काळ पोलिसांना देण्यात आली आहे. तर घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत शिळ डायघर येथून बापाला ताब्यात घेऊन कळवा रुग्णालयात आणले आहे.