राळेरास- उत्तर सोलापूर तालुक्यात पाणी फाउंडेशनच्यावतीने सुरू असलेल्या कामांबाबत बॉलीवूड अभिनेता आमिर खान व त्याची पत्नी किरण राव यांनी गावकर्यांशी संवाद साधला.
महाराष्ट्राला दुष्काळमुक्त बनवण्यासाठी आमिर आणि किरण यांनी 2016 साली पाणी फाउंडेशनची स्थापना केली असून ही नॉन प्रॉफिट तत्वावर काम करणारी कंपनी आहे. या फाउंडेशनमध्ये आमिरच्या पूर्वी प्रसारीत होत असलेला सत्यमेव जयतेच्या कोअर टीमचा समावेश आहे.
सत्यमेव जयते चे दिग्दर्शक सत्यजित भटकळ हे फाउंडेशनचे सी.ई.ओ. तर रीना दत्ता या सी.ओ.ओ. आहेत.