येरळवाडी तलावात 9 फ्लेमिंगो पक्षी दाखल

गुरूवार, 10 ऑगस्ट 2023 (22:41 IST)
Satara : खटाव तालुक्यातील येरळवाडी हे वडूजपासून सात किमी अंतरावर आहे. येरळवाडी येथील तलावामधील पाण्याचा मृतसाठा दिसून येत असल्याने सुरक्षित पाणथळ आणि मुबलक अन्न साठ्यामुळे रोहित पक्षी (प्लेमींगो) या परिसरात स्थायीक होताना दिसून येत आहे. मनाला भूरळ घालणारे 9 स्थलांतरित प्लेमिंगो पक्षी मुक्कामास आल्याने परिसरात किलबिलाट वाढला आहे.प्रथम मायणी येथील इंदिरा गांधी पक्षी अभय अरण्यात व कानकात्रे येथे पक्षाचे वास्तव्य असायचे.त्यामुळे त्यांनी येरळा तलाव परिसरात सुरक्षितेला प्राधान्य देत त्यांनी आपले वास्तव्य येरळवाडी मध्यम प्रकल्पावर हलविले आहे.
 
खटाव तालुक्यातील सुर्याचीवाडी ,मायणी येथील अभयआरण्य तलावात मुबलक पाणीसाठा नसून अन्नसाठा व सुरक्षेतेचा अभाव असल्याने आपसुकच परदेशी पाहुण्यांनी येरळा तलावाला प्राधान्य दिले. तलाव परिसरात पक्ष्यांचा वावरही दिसत असून,सकाळी व सायंकाळी या पाहुण्यांचे निरीक्षण करण्यासाठी पक्षीप्रेमींची पावले येरळा तलावाकडे वळू लागली आहेत.येरळवाडी मध्यम प्रकल्पात अनेक स्थलांतरित पक्षी दाखल झाले आहेत.यामध्ये प्रारंभी 9 फ्लेमिंगो पक्षी विराजमान झाले आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती