मार्च अखेर 6500 आरोग्यवर्धिनी केंद्रे सुरु होणार

आरोग्यविषयी प्रतिबंधात्मक आणि प्रबोधनात्मक सेवा लोकांपर्यंत पोहोचवण्याकरिता सर्व उपकेंद्रे, प्राथमिक आरोग्य केंद्रे व नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांचे टप्प्याटप्प्याने आरोग्यवर्धिनी केंद्रांमध्ये रूपांतर केले जात आहेत. मार्च अखेर सुमारे 6500 आरोग्यवर्धिनी केंद्रे राज्यात कार्यान्वित होतील,अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. 
 
गडचिरोली, वाशिम, उस्मानाबाद व नंदुरबार हे राज्यातील चार आकांक्षित जिल्हे तसेच भंडारा, चंद्रपूर, वर्धा, सातारा, पालघर, नाशिक, लातूर, पुणे, अहमदनगर, नांदेड, हिंगोली, गोंदिया,अमरावती, सिंधुदुर्ग, जळगाव असे 19 जिल्ह्यांतील एकूण 1169 आरोग्य उपकेंद्रांचे व सर्व जिल्ह्यांतील 1501 (ग्रामीण भागातील) व 413 (शहरी भागातील) प्राथमिक आरोग्य केंद्रे असे एकूण 3083 आरोग्यकेंद्रांचे आरोग्यवर्धिनी केंद्रांमध्ये रुपांतर करण्यात आले असल्याचे टोपे म्हणाले.
 
दुसर्‍या टप्प्यामध्ये जालना, बीड, परभणी यासारख्या मराठवाड्यातील जिल्ह्यांसह उर्वरित जिल्ह्यांत ही केंद्रे सुरू होतील. सदर केंद्रांमध्ये समुदाय आरोग्य अधिकारी  या पदावर आयुर्वेद, युनानी, नर्सिग पदवीधारक नियुक्त केले जाणार आहेत. 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती