मिळालेल्या माहितीनुसार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्ह्यात एकजुटीने मोठी हिंसक घटना घडवून आणण्याचा नक्षलवाद्यांचा डाव जिल्हा पोलिस दलाच्या जवानांनी उधळून लावला आहे. जिल्ह्यातील भामरागड तहसील अंतर्गत कोपरशी वनसंकुलात नक्षलवादी लपून बसल्याची गोपनीय माहिती मिळताच जवानांनी नक्षलविरोधी अभियान सुरू केले. यावेळेस पोलीस दलाचे जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत पोलीस दलाच्या जवानांनी 5 नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे. या घटनेत एक जवान जखमी झाल्याची माहिती आहे.