मंगळवारी पोलिसांनी सांगितले की, २० वर्षीय आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याची चौकशी सुरू आहे. आरोपी हा मुंब्रा येथील ठाकूरपाडा परिसरातील रहिवासी आहे. आवाज ऐकल्यानंतर काही महिलांनी पोलिसांना माहिती दिली. पीडित मुलगी जवळच्या इमारतीत राहत होती. पोलिसांनी खून आणि पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मुंब्रा येथील सम्राट नगरमधील एका १० मजली इमारतीत सोमवारी रात्री ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने पीडितेला खेळण्याचं आमिष दाखवून आपल्या घरी नेले, जिथे त्याने तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर त्याने धारदार शस्त्राने मुलीचा गळा चिरला आणि मृतदेह सहाव्या मजल्याच्या बाथरूमच्या खिडकीतून फेकून दिला. ठाणे महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला रात्री मृतदेहाची माहिती मिळाली. प्रमुख यासीन तडवी यांनी सांगितले की, मुलीचा मृतदेह इमारतीच्या उभ्या डक्टमध्ये आढळला. पोस्टमोर्टम अहवालात बलात्कार आणि मानेवर खोल जखमा असल्याचे सिद्ध झाले आहे.