Maharashtra Marathi Breaking News Live Today : उत्तर भारतीय विकास सेनेचे (UBVS) अध्यक्ष सुनील शुक्ला यांनी राज ठाकरे यांचा पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS) विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यानंतर मनसे कार्यकर्ते संतप्त झाले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना मराठी बोलण्यावरून सुरू झालेले आंदोलन थांबवण्याचे आदेश दिले आहे. महाराष्ट्राच्या महायुती सरकारमधील मंत्री उदय सामंत यांच्याशी झालेल्या बैठकीनंतर राज यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना सध्या शांत राहण्याचे आदेश देणारा लेखी आदेश जारी केला. पण या आंदोलनानंतर राज ठाकरे यांच्या पक्षाच्या अडचणी वाढल्या आहे. राज्यात घडत असलेल्या सर्व घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. तर बघू आज दिवसभरात काय घडतं ते....