गणेश भक्तांसाठी आनंदाची बातमी म्हणजे गणेशोत्सव काळात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने गणपती स्पेशल ट्रेनच्या फेऱ्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांनी ही माहिती दिली.
गणेशोत्सव हा कोकणातील सर्वात मोठा सण असतो. त्या निमित्तानं दरवर्षी गणेशोत्सव काळात मुंबई, पुण्यातून गणपती विशेष रेल्वे गाड्या सोडल्या जातात. तसंच, गाड्यांच्या फेऱ्याही वाढवल्या जातात. यंदाही तशी सोय करण्यात आली आहे. मात्र, वाढती गर्दी लक्षात घेऊन यंदा पश्चिम रेल्वेनं फेऱ्यांमध्ये वाढ केली आहे. सर्वप्रथम कोकणात गणपती स्पेशल ट्रेनच्या ७२ फेऱ्या होणार होत्या. त्यात आणखी ४० फेऱ्यांची वाढ करण्यात आली होती. त्यानंतर आता त्यात आणखी ३८ फेऱ्यांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळं यंदा गणेशोत्सव काळात कोकणात रेल्वेच्या तब्बल १५० फेऱ्या होणार आहेत. ३ ते १८ सप्टेंबर दरम्यान या गाड्या धावतील.
या संदर्भातील अधिसूचना काढण्यात आली आहे. यापुढंही देखील वेटिंग लिस्ट वाढल्यास फेऱ्या आणखी वाढवण्यात येतील, असं दानवे यांनी स्पष्ट केलं आहे. 'कोकणात जाणाऱ्या प्रत्येक प्रवाशांची पूर्ण काळजी केंद्र सरकार घेईल. गणपती उत्सव साजरा करण्यासाठी कोकणात जाताना कोणालाही अडचण होऊ नये, असा केंद्राचा प्रयत्न असल्याचंही दानवे यांनी सांगितलं.
1. मुंबई- सावंतवाडी रोड विशेष (२ फे-या)
- 01235 विशेष दि. ७.९.२०२१ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून १३.१० वाजता सुटेल आणि सावंतवाडी रोड येथे दुसऱ्या दिवशी ०२.०० वाजता पोहोचेल.
- 01236 विशेष दि.१०.९.२०२१ रोजी सावंतवाडी रोड येथून ०२.३० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथे त्याच दिवशी १४.०० वाजता पोहोचेल.
- संरचना: १ द्वितीय वातानुकूलित, १ तृतीय वातानुकूलित, २ शयनयान, १८ द्वितीय आसन श्रेणी.
आधी घोषित केलेल्या श्रीगणेश उत्सव विशेष ट्रेनच्या अतिरिक्त फेऱ्या
वर नमूद विशेष ट्रेन व्यतिरिक्त, आधीच जाहीर केलेल्या विशेष ट्रेनच्या अतिरिक्त फेऱ्या (८) खालील प्रमाणे चालविण्यात येतील:
- 01227 मुंबई- सावंतवाडी रोड विशेष दि. ४.९.२०२१ रोजी.
- 01228 सावंतवाडी रोड-मुंबई विशेष दि. ४.९.२०२१ रोजी.
- 01229 मुंबई- रत्नागिरी विशेष दि. ३.९.२०२१ रोजी.
- 01230 रत्नागिरी- मुंबई विशेष दि.५.९.२०२१ रोजी.
- 01234 रत्नागिरी- पनवेल विशेष दि. ३.९.२०२१ रोजी.
- 01231 पनवेल- सावंतवाडी रोड विशेष दि. ४.९.२०२१ रोजी.
- 01232 सावंतवाडी रोड -पनवेल विशेष दि. ४.९.२०२१ रोजी.
- 01233 पनवेल- रत्नागिरी विशेष दि. ५.९.२०२१ रोजी.
- आरक्षण: वरील अतिरिक्त विशेष गाड्यांसाठी आणि आधीच घोषित केलेल्या विशेष गाड्यांच्या अतिरिक्त फेऱ्यासाठी विशेष शुल्कासह बुकिंग दि. ७.८.२०२१ पासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरु होईल.
सविस्तर थांबे आणि वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES अॅप डाउनलोड करावे.
या विशेष गाड्यांमध्ये कन्फर्म तिकीट असलेल्या प्रवाशांनाच चढताना, प्रवासा दरम्यान आणि गंतव्यस्थानकावर कोविड १९ शी संबंधित सर्व नियमांचे पालन करून प्रवासाची परवानगी असेल.