महाराष्ट्रात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या 10 महिलांसह 18 बांगलादेशींना अटक

शनिवार, 4 मार्च 2023 (13:30 IST)
नवी मुंबई पोलिसांनी 18 बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे. त्यात 10 महिला आणि 8 पुरुषांचा समावेश आहे.
 
लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी सर्वजण जमले होते
रबाळे पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले की, "नवी मुंबईतील घणसोली परिसरात काही बांगलादेशी नागरिक जमा झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यापैकी एकाच्या लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी ते इमारतीत एकत्र जमले होते. तेव्हा कारवाई करत, नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी रात्री या परिसरात छापा टाकला.
 
विविध कलमान्वये गुन्हा दाखल
 
या परिसरातून 10 महिला आणि 8 पुरुषांना या कारवाईदरम्यान पकडण्यात आले कारण ते गेल्या एक वर्षापासून या परिसरात व्हिसा आणि पासपोर्टसारख्या वैध कागदपत्रांशिवाय राहत होते. पोलिसांनी सांगितले की त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. मात्र अद्यापपर्यंत आरोपींची नावे समोर आलेली नाहीत.
 
यापूर्वीही ठाण्यात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या अनेक बांगलादेशींना ठाण्यात अटक करण्यात आली आहे. या सर्वांचा शोध घेऊन त्यांना अटक करण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत. यापूर्वी 9 बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली होती.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती