एका महिलेची छेड काढल्यामुळे ही हत्या झाल्याचे दिंडोशी पोलिस ठाण्यातील पोलिसाठी सांगितले. त्याची माहिती मिळाल्यानंतर रमेश जाधव यांनी या लोकांना जाब विचारला होता. त्यानंतर ते लोक तेथून निघून गेले. मात्र, रात्री दहा- साडेदहाच्या सुमारास हल्लेखोरांनी सेना गटप्रमुख रमेश जाधव यांच्या घरात अचानक शिरले. यानंतर त्यांनी तीक्ष्ण हत्याराच्या सहाय्याने जाधव यांच्यावर सपासप वार केले. रमेश जाधव यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे खोत डोंगरी भागात तणाव निर्माण झाला होता.