पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेतील त्रुटी, केजरीवाल यांचा काँग्रेसवर हल्लाबोल

सोमवार, 14 फेब्रुवारी 2022 (11:53 IST)
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अमृतसरमध्ये पत्रकार परिषद घेत काँग्रेस सरकारवर जोरदार हल्ला चढवला. केजरीवाल म्हणाले की पंजाबच्या जनतेला असुरक्षित वाटत आहे. महिलांवरील अत्याचारात वाढ झाल्याची काही महिन्यांत अनेक प्रकरणे समोर आली आहेत. लुधियानामध्ये बॉम्बस्फोट झाला.

काँग्रेसवर हल्लाबोल करताना केजरीवाल म्हणाले की, काँग्रेसवाले एकमेकांना पराभूत करण्याचा प्रयत्न करत आहेत. पंजाबचा पराभव करण्यासाठी सर्व पक्ष पुन्हा एकत्र आले आहेत मात्र यावेळी संपूर्ण पंजाब या पक्षांना मिळून पराभूत करेल.
 
केजरीवाल म्हणाले की पीएम मोदी पंजाबमध्ये आले तेव्हा त्यांच्या सुरक्षेत त्रुटी राहिल्या. पंतप्रधानांची सुरक्षा ही देशाची सुरक्षा असून यावर राजकारण होता कामा नये. मात्र दोन्ही बाजूंनी राजकारण झाले.

ते म्हणाले की केंद्र सरकारशी आमचे 100 मतभेद असले तरी जेव्हा जेव्हा लोकांच्या हिताचा प्रश्न आला तेव्हा आम्ही सहकार्य केले आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती