दगडूशेठ गणपतीला शमी-मंदार माळ अर्पण, प्रत्येक मण्याला सोन्याचा साज

बुधवार, 28 ऑक्टोबर 2020 (07:35 IST)
पुण्याच्या दगडूशेठ गणपतीला शमी-मंदार माळ अर्पण करण्यात आली. प्रत्येक मण्याला सुवर्णसाज चढविण्यात आला असून, एकूण ८५ तोळे सोने वापरण्यात आले आहे. तर, श्री क्षेत्र मोरगाव येथून शमी व मंदारच्या काष्ठा उपलब्ध झाल्या आहेत. मंदिरामध्ये विश्वस्तांच्या उपस्थितीत विधीवत पूजन करुन श्रीगणेश मूर्तीला ही माळ घालण्यात आली आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे विजयादशमीच्या दिवशी शमी-मंदाराची सुवर्णसाज असलेली माळ गणपतीला घालण्यात आली आहे. 
 
शमी-मंदाराच्या  झाडाच्या  लाकडापासून साकारण्यात आलेले मणी या माळांमध्ये लावण्यात आले आहेत. मुख्य मूर्तीला मोठी व पूजेच्या चांदीच्या मूर्तीला लहान अशा दोन माळा तयार करण्यात आल्या आहेत. प्रत्येक माळेमध्ये १०८ मणी व १ मेरु मणी लावण्यात आला आहे. या शिवाय सुमारे २८५०  पांढ-यां खडयांची कलाकुसर देखील करण्यात आली आहे. राजू वाडेकर यांनी सलग १५ दिवस स्वत:च्या हाताने ट्रस्टच्या गणपती सदन या इमारतीमध्ये मणी घडविले आहेत. या माळेलाचं सुवर्णसाज चढविला आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती