पुण्यात १ नोव्हेंबरपासून उद्याने खुलणार

मंगळवार, 27 ऑक्टोबर 2020 (08:00 IST)
कोरोना संसर्गाच्या गेल्या सात महिन्यांपासून बंद असलेली उद्याने येत्या १ नोव्हेंबरपासून खुली करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतच आदेश महापालिकेकडून लवकरच काढला जाईल’, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.
 
कोरोना संसर्ग सुरु झाल्यापासून शहरातील सर्व उद्याने बंद ठेवण्यात आली होती. मात्र आता कोरोना संसर्ग बऱ्यापैकी आटोक्यात असताना उद्याने खुली करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतच्या सूचना महापौर मोहोळ यांनी दिल्या आहेत. कोरोना संसर्ग नियंत्रणात असला तरी अटी आणि शर्थीच्या आधारावर उद्याने खुली केली जाणार आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती