याबाबत सविस्तर माहिती अशी की, जयसिंगपूर येथे एका अल्पवयीन मुलीचा विवाह झाला असल्याचे वुमन्स हेल्पलाईनच्या सदस्यांना समजले. त्यानंतर सदस्यांनी संबंधित पोलीस अधीक्षक, पोलीस उपअधीक्षक तसेच महाराष्ट्र महिला काँग्रेसच्या अध्यक्षा संध्या सवालाखे यांना देखील माहिती देण्यात आली. त्यांनी गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांना सांगून सूत्रे हलवली.
सुरुवातीला वयाचा पुरावा न मिळाल्याने पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल करण्यात केला नाही. मात्र, वुमन्स हेल्पलाईनच्या सदस्यांनी मुलीच्या वयाचे पुरावे गोळा करून पोलिसांसमोर सादर केले. त्यानंतर याप्रकरणी पोलिसांनी कारवाई केली. सर्वांच्या प्रयत्नांमुळे 15 वर्षीय मुलीचा 19 वर्षीय मुलासोबत लावलेला विवाह मोडून मुलीची सुटका करण्यात आली. तसेच पती आणि त्याच्या सात नातेवाईकांवर जयसिंगपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.