अहमदनगरमध्येही मराठीतून पाट्या, दुकानदाराना १५ दिवसांची मुदत

गुरूवार, 23 जून 2022 (08:41 IST)
अहमदनगर शहरातील सर्व दुकाने वआस्थापनांच्या पाट्या मराठी भाषेतच करण्याचा आदेश महापालिकेने दिला आहे. यासाठी दुकानदाराना १५ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर दुकाने व आस्थापनांवर नियमानुसार कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
 
महानगर पालिका हद्दीतील सर्व दुकाने व आस्थापनांच्या पाट्या मराठी भाषेत असाव्या असा राज्य सरकारने आदेश दिला आहे. त्यानुसार महापालिकेने हद्दीतील सर्व दुकाने व आस्थापनांना जाहीर सूचना दिली आहे.
 
आपल्या दुकानाच्या दर्शनी भागावरील फलक मराठी भाषेत सुधारित तरतुदीनुसार करण्याचे आवाहन केले आहे. पंधरा दिवसांची मुदत यासाठी देण्यात आली आहे. या कालावधीत जे गाळेधारक, दुकानदार वा आस्थापनाया आदेशाचे पालन करणार नाहीत, त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचेही म्हटले आहे

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती