11 सुवर्णांनी अमेरिकेच्‍या फेल्‍प्‍सचा जागतिक विक्रम

भाषा

बुधवार, 13 ऑगस्ट 2008 (15:51 IST)
PTI
अमेरिकेचा दिग्गज स्‍वीमर मायकल फेल्प्स याने बुधवारी जागतिक विक्रम नोंदवित सर्वांत कमी वेळेत पुरुषांच्‍या 200 मीटर बटरफ्लाय स्पर्धा चार गुणांसह तर 200 मीटर फ्रीस्टाइल रिले स्‍पर्धा जिंकून आपल्‍या ऑलम्पिक करिअरमधील 10 वे व 11 वे सुवर्ण पदक जिंकले आहे. या विक्रमामुळे त्‍याची जागतिक ऑलम्पिकच्‍या जागतिक इतिहासात नोंद झाली आहे.

फेल्प्सने एक मिनट 52.03 सेकंदात स्पर्धा जिंकून मागील वर्षी मेलबोर्नमध्‍ये जागतिक विजेत्‍या स्‍पर्धेतील स्‍वतःचाच 1 मिनट 52.09 चा विक्रम तोडला. तर हंगेरीच्‍या लॅसलो सेशने एक मिनट 52.70 सेकंदात दूसरे स्‍थान मिळविले. तर जापानच्‍या ताकेशी मातसुदा याला कास्य पदकावरच समाधान मानावे लागले. फेल्प्सच्‍या विजयाची मालिका इथेच संपली नाही तर त्‍यांनी पुरुषांच्‍या चार गुणा 200 मीटर फ्रीस्टाइल रिले स्‍पर्धेत 6 मिनट 58.56 सेकंदात पुर्ण करून सुवर्ण पदक पटकाविले.

बिजींगच्‍या तरणतलावात त्‍याने पाचवा जागतिक विक्रम करीत पाचवे सुवर्ण्‍ध पदक मिळविले. त्‍याने चार वर्षांपूर्वी एथेंस ऑलम्पिकमध्‍ये सहा सुवर्ण पदक जिंकले आहेत. या 23 वर्षीय अमेरिकन खेळाडूने पावो नुर्मी, कार्ल लुइस, मार्क स्पिट्ज आणि लेरिसा लॅटीनीना या ऑलम्पिकच्‍या महानायकांना मागे टाकले आहे. त्‍यांच्‍या नावे 9 सुवर्ण पदके आहेत.

वेबदुनिया वर वाचा