भारताची बॅडमिंटनपटू सायना नेहवाल क्वॉर्टर फायनलमध्ये इंडोनेशियाच्या मारिया क्रिस्टिन युलियांती हिच्याकडून पराभूत झाली असून ऑलम्पिकमधील एकल स्पर्धेतून बाहेर झाली आहे.
ऑलम्पिकमध्ये वाईड कार्डच्या मदतीने प्रथमच सहभागी झालेली 18 वर्षीय सायनाला एका संघर्षपूर्ण सामन्यात 26-28, 21-14, 21-15 ने पराभव पत्करावा लागला आहे. तिच्या या पराभवामुळे बॅडमिंटनमध्ये भारताचे आव्हान समाप्त झाले आहे. अनूप श्रीधर यापूर्वीच पुरुष एकल गटातून पराभूत झाला आहे.