लयी भारी, व्हॉट्सअॅपचे दोन नवीन फीचर

व्हॉट्सअॅपने GIF शी संबंधित नवे  फीचर आणले  आहे. यात अँड्रॉईड बीटा व्हर्जन यूझर्ससाठी आता GIF चे पर्यायही दिले जातील, जे तुम्ही सर्च करुन समोरच्या यूझर्सना पाठवू शकता. त्याचसोबत नव्या अपडेटमध्ये फोटो पाठवण्याची मर्यादा 10 वरुन 30 करण्यात येणार आहे. व्हॉट्सअॅपच्या बीटा अँड्रॉईड 2.17.6 व्हर्जनचा वापर करणाऱ्या यूझर्सना नवे फीचर मिळणार आहे.

तर दुसऱ्या फीचरमध्ये व्हॉट्सअॅपवरुन इमेज शेअर करताना याआधी एकावेळी केवळ 10 इमेज शेअर करण्याची सुविधा होती. मात्र, आता 10 ऐवजी 30 इमेज शेअर करणं शक्य होणार आहे. आता नव्या अपडेटमध्ये व्हॉट्सअॅप यूझर्सना दोन्ही नवे फीचर्स उपलब्ध होणार आहेत. सध्या बीटा अँड्रॉईड 2.17.6 व्हर्जन वापरणाऱ्यांनाच नव्या फीचरची सुविधा सुरु करण्यात आली आहे.

वेबदुनिया वर वाचा