Motorola One Power झाला लाँच, हे आहे धमाकेदार फीचर्स

सोमवार, 24 सप्टेंबर 2018 (17:02 IST)
Motorola One Power ला भारतात लाँच करण्यात आले आहे. फीचर्सची गोष्ट केली तर मोटोरोला वन पावरमध्ये यूजरला स्नॅपड्रेगन 636 प्रोसेसर, 5000 एमएएच बॅटरी, स्नॅपड्रेगन 636 प्रोसेसर, डिस्प्ले नॉच आणि दोन रियर कॅमेरे मिळतील.   
 
एंड्रॉइड वन परीवरचा भाग असल्यामुळे Motorola One Powerला भविष्यात नियमितपणे  एंड्रॉयड अपडेट मिळण्याची ग्यारंटी असून मोटोरोला वन पावर एंड्रॉयड वनची टक्कर Xiaomi Redmi Note 5 Pro, Asus ZenFone Max Pro M1 आणि Nokia 6.1 Plus शी होणार आहे.  
 
Motorola One Power ची किंमत 15,999 रुपये राहणार आहे. फोनचा एक वॅरिएंट आहे, 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज आहे. फोनला ई-कॉमर्स वेबसाइटच्या माध्यमाने विक्री करण्यात येईल. फोनमध्ये 6.2 इंचीच फुल-एचडी+ (1080x2246 पिक्सल) एलसीडी मॅक्स विजन पॅनल आहे. याचा देखील आस्पेक्ट रेशियो 19:9 आहे.  
 
हँडसेटमध्ये ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रेगन 636 प्रोसेसरसोबत एड्रेनो 509 जीपीयू देण्यात आला आहे. जुगलबंदीमध्ये 4 जीबी रॅम देण्यात आली आहे. इनबिल्ट स्टोरेज 64 जीबी आहे. याला 256 जीबीपर्यंतचा मायक्रोएसडी कार्डचे वापर करण्यात येईल. कॅमेर्‍याची गोष्ट केली तर फोनमध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप आहे.  
 
प्रायमरी सेंसर 16 मेगापिक्सलचे आहे आणि सेकंडरी सेंसर 5 मेगापिक्सलचा. फ्रंट पॅनलवर 12 मेगापिक्सलचा सेंसर देण्यात आला आहे. बॅटरी 5000 एमएएचची आहे.  
 
फोनमध्ये 4जी एलटीई, ब्लूटूथ 5.0, वाय-फाय 802.11एसी, यूएसबी टाइप-सी आणि 3.5 एमएम हेडफोन जॅक सारखे कनेक्टिविटी फीचर्स देखील आहे. फोनमध्ये फिंगरप्रिंट सेंसरपण लागला आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती