टेक्नो मोबाइलने भारतात त्यांचे दोन स्मार्टफोन्स सादर केले आहे, ज्यांचे नाव Camon iACE 2 आणि Camon iAce 2x आहे. दोन्ही स्मार्टफोनचे तपशील समान आहे फक्त रॅम वेगळी आहे. Camon iAce 2x च्या 3 जीबी + 32 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 7,599 रुपये आहे. तर Camon iACE 2 च्या 2 जीबी + 32 जीबीची किंमत 6,699 रुपये आहे.
स्पेसिफिकेशनबद्दल बोलायचे झाले तर या दोन्ही फोनमध्ये 5.5 इंच फुल एचडी डिस्प्ले आहे आणि त्याचे गुणोत्तर प्रमाण 18: 9 आहे. फोनमध्ये 2.0 गीगाहर्ट्झ हेलीओ ए 22 64 बिट क्वाड कोर प्रोसेसर आहे. फोनमध्ये फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस रिकग्नाइजेशन टेक्नॉलॉजी आहे. दोन्ही स्मार्टफोनमध्ये ड्युअल सिम पर्याय आहे. मायक्रो एसडी कार्डद्वारे फोनची स्टोरेज 128 जीबी पर्यंत वाढवता येते. दोन्ही स्मार्टफोन Android 8.1 ऑरियो आधारित कस्टम यूआय एनआयओएस 4.1 स्किनवर चालतात. यात 3050 एमएएचची बॅटरी आहे. 8 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा देखील आहे. मागे ड्यूल रिअर कॅमेरा सेटअप आहे, त्यात पहिला सेन्सर 13 मेगापिक्सेल आहे.