फोन खरेदी केल्यानंतर ग्राहकांना रिलायन्स जिओकडून 100 जीबी इंटरनेट डेटा, 2,200 रुपयांचा कॅशबॅक आणि सोबत 1,200 रूपयांचे मिंत्रा या इ-कॉमर्स साइटचे व्हाउचर मिळणार आहे.
'ऑनर 9एन'च्या 3 जीबी रॅम 32 जीबी स्टोअरेज असलेल्या सर्टफोनची किंमत 11,999/- रुपये आहे. 4 जीबी रॅम/ 64 जीबी स्मार्टफोनची किंमत 13,999 रुपये आहे. तर 4 जीबी रॅम 128 जीबी हँडसेटची किंमत 17,999 आहे. 31 जुलैपासून फ्लिपकार्टवर याची विक्री सुरू होणार आहे. 'ऑनर'च्या अधिकृत स्टोअरमधूनही हा फोन खरेदी करता येणार आहे.