गेल्या महिन्यात गॅलॅक्सी एम (Galaxy M) सिरींज लॉच केल्यानंतर Samsung आता Galaxy M30 लॉच करणार आहे. या M सिरींजमध्ये M10 आणि M30 नंतर येणारा तिसरा फोन होणार. आयएएनएसच्या अहवालानुसार, भारतात Galaxy M30 ची किंमत 14990 रुपये असेल. दुसरीकडे, Galaxy M10 च्या प्रारंभिक किमतीबद्दल बोलू तर ती 7990 रुपये आहे. याशिवाय Galaxy M20 ची सुरुवाती किंमत 10,990 रुपये आहे.
अहवालात पुढे असे म्हटले आहे की भारतात Galaxy M30 ची विक्री मार्चच्या पहिल्या आठवड्यात सुरू होईल. तथापि, सॅमसंगने आतापर्यंत Galaxy M30 च्या लॉन्चची पुष्टी केली नाही. Galaxy M30 मध्ये Exynos 7904 प्रोसेसर देण्यात आला आहे. त्यात 4 जीबी रॅम आणि 64 जीबी मेमरी असेल. या व्यतिरिक्त, कंपनी दुसर्या वेरिएंटमध्ये देखील फोन लॉच करू शकते. हे सहा जीबी रॅम आणि 128 जीबी मेमरी होऊ शकतो. तसेच फोनमध्ये ट्रिपल रीअर कॅमेरा सिस्टम आणि पाच हजार एमएएचची बॅटरी असेल.