ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एअरटेलकडून ऑफर्सचा वर्षाव चालूच आहे. ज्या एअरटेल ग्राहकांनी आतापर्यंत 4G सेवेचा लाभ घेतलेला नाही त्यांना एका मिस कॉलवर 1 GB डेटा मोफत मिळणार आहे.
हा डेटा 28 दिवस ते 90 दिवसांपर्यंत वापरता येणार आहे. ही ऑफर मिळवण्यासाठी 52122 या नंबरवर मिस कॉल द्यायचा आहे. आतापर्यंत ज्या ग्राहकांनी एअरटेल 4G सेवेचा लाभ घेतलेला नाही त्यांच्यासाठीच ही ऑफर आहे.
आंध्र प्रदेश, तेलंगणा, दिल्ली, कोलकाता, कर्नाटक, केरळ, हरियाणा या राज्यांमध्ये सध्या ही ऑफर लाँच केली आहे. एअरटेल 4G प्रीपेड ग्राहकांसाठी ही ऑफर आहे.