उत्तर प्रदेशातील बागपतमध्ये शनिवारी रात्री उशिरा घराच्या खोलीत झोपलेल्या तीन महिन्यांच्या निष्पाप मुलाला माकडाने पळवून नेले. नातेवाइकांनी शोध घेतला असता बाळ पाण्याच्या टाकीत पडलेले आढळून आले. नातेवाइकांनी बाळाला रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. बाळाच्या मृत्यूने कुटुंबीयांना धक्का बसला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गढी काळंजरी गावातील एका घरात खाटेवर तीन महिन्यांचा केशव हा शनिवारी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास झोपला होता, त्यादरम्यान माकडाने त्याला पळवून नेले.कुटुंबीयांनी बाळाचा शोध घेतला. तरीही त्याच्या पत्ता लागेना.