कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची तातडीची बैठक

रविवार, 9 जानेवारी 2022 (12:45 IST)
देशभरात पसरलेल्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला पाहता  पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा कोविड-19 च्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक बोलावली आहेत. ही बैठक आज म्हणजेच रविवारी दुपारी 4.30 वाजता दिल्लीत होणार आहे. आज देशात कोरोनाचे सुमारे एक लाख 60 हजार नवीन रुग्ण आढळले आहेत आणि सक्रिय प्रकरणांमध्येही मोठी भरारी  झाली आहे. आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 224 दिवसांनंतर देशातील कोरोनाच्या दैनंदिन रुग्णांची संख्या 1.5 लाखांच्या पुढे गेली आहे
गेल्या एका दिवसात सक्रिय प्रकरणांमध्ये 1 लाख 65 हजार 553 रुग्णांची वाढ झाली आहे. आता देशात कोरोनाचे एकूण 5 लाख 90 हजार 611 सक्रिय रुग्ण आहेत, जे सुमारे 197 दिवसांनंतरचे सर्वाधिक आहे. त्याचबरोबर गेल्या 24 तासांत कोरोनाच्या 327 रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. 
राज्यांनी नाईट कर्फ्यू, वीकेंड कर्फ्यू, बाजार उघडण्यासाठी इव्हन-ऑड  योजना यांसारखे अनेक कठोर निर्णय घेतल्यानंतरही ओमिक्रॉन प्रकार वेगाने पसरत आहे. देशात आतापर्यंत ओमिक्रॉनच्या 3हजार 623 प्रकरणांची पुष्टी झाली आहे. यापैकी गेल्या एका दिवसात 552 प्रकरणांची नोंद झाली आहेत. तर, ओमिक्रॉनच्या एकूण रूग्णांपैकी 1409 बरे देखील झाले आहेत.
ओमिक्रॉनची सर्वाधिक 1009 प्रकरणे महाराष्ट्रात आहेत. त्यापाठोपाठ दिल्लीत 513, कर्नाटकात 441, राजस्थानमध्ये 373, केरळमध्ये 333 आणि गुजरातमध्ये 204 आहेत. 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती