सुप्रीम कोर्टात दिल्लीच्या प्रदूषणावर सुनावणी झाली. फटाके आणि शेतीतील कचरा जाळण्याने प्रदूषण होतेच. पण गाड्याही मोठ्या प्रमाणात प्रदूषण करतात. यामुळे दिल्लीतल्या प्रदूषणावर तोडगा काढण्यासाठी सुप्रीम कोर्टाने केंद्रीय परिवहनंत्री नितीन गडकरींकडेच सल्ला मागितला. गडकरींकडे भरपूर नवनवीन आयडिया असतात. यामुळे त्यांनी कोर्टात यावे. आणि प्रदूषण रोखण्यासाठी लागू करण्यासाखे जे उपाय आहेत ते आम्हाला सांगावेत, असे सुप्रीम कोर्टाचे सरन्यायधीश शरद बोबडे यांनी सांगितले.
वायू प्रदूषण कमी करण्यासाठी सर्व सार्वजनिक परिवहन उपक्रम आणि सरकारी पेट्रोल, डिझेल वाहनांच्या जागी इलेक्ट्रिक वाहने आणली गेली पाहिजेत, असे मत सुप्रीम कोर्टाने मांडले. या इलेक्ट्रिक वाहनांच्या मुद्द्यावर गडकरींनी न्यायालयात येऊन आपला सल्ला द्यावा, असे सरनाधीश बोबडे म्हणाले. गडकरींना कोर्टात आणण्यासाठी सहकार्य कराल का? असा प्रश्न बोबडे यांच्या अध्यक्षतेखाली खंडपीठाने यावेळी सॉलिसीटर जनरल ए. एन. नाडकर्णी यांना केला.