कोविड-१९ या आजारामुळे लोकांची जगण्याची पद्धतच बदलून गेली आहे आणि याहून कोणीही सुटलेले नाही. या आजाराच्या पार्श्वभूमीवर आता सुप्रीम कोर्टने देखील वकिलांना अंगात काळ्या रंगाचा कोट किंवा रोब घालण्याचं बंधन नाही, स्पष्ट केलं आहे.
यासंदर्भात सुप्रीम कोर्टानं जाहीर केलेल्या निवेदनमध्ये म्हटलं की, “व्हर्चुअल कोर्ट सिस्टिममध्ये सुनावणीदरम्यान, वकील मंडळी प्लेन पांढरा शर्ट, पांढरी सलवार-कमीज, पांढरी साडी तसेच गळ्याभोवती प्लेन पांढरा नेकबँड वापरु शकतात. वैद्यकीय सल्ल्याला अनुसरुन हा निर्णय घेण्यात आला असून पुढील आदेश येईपर्यंत ही सवलत देण्यात आली आहे.”