मनमोहन सिंग यांना रुग्णालयातून सुट्टी

मंगळवार, 12 मे 2020 (16:25 IST)
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. रविवारी रात्री छातीत दुखत असल्याची तक्रार केल्यानंतर त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. डॉ. नितीश नायक यांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू होते. नव्या औषधांची रिअॅक्शन झाल्याने मनमोहन सिंग यांची प्रकृती बिघडली असल्याचं सांगण्यात आलं होतं. तसंच या ठिकाणी त्यांची करोनाची चाचणी करण्यात आली होती. त्यांची करोना चाचणी निगेटिव्ह आल्याचं सांगण्यात आलं होतं.
 
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग हे हार्ट पेशंट आहेत. यापूर्वी दोन वेळा त्यांची बायपास सर्जरी झाली आहे. १९९० मध्ये पहिल्यांदा इंग्लंडमध्ये त्यांची पहिली बायपास सर्जरी झाली होती. त्यानंतर २००४ मध्ये त्यांची अँजिओप्लास्टीही करण्यात आली होती. २००९ मध्ये पुन्हा त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यावेळी ब्लॉक्ड आर्टरिज ओपन करण्यासाठी त्यांची आणखी एक बायपास सर्जरी करण्यात आली होती. याव्यतिरिक्त त्यांना मधुमेहाचा त्रासदेखील आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती