माजी पंतप्रधान मनमोहन सिंग रुग्णालयात दाखल, प्रकृती स्थिर

सोमवार, 11 मे 2020 (12:05 IST)
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. छातीत दुखत असल्याची तक्रार केल्यानंतर त्यांना त्वरित एम्स रुग्णालयात नेण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू असून आता प्रकृती स्थिर असल्याची माहिती दिली जात आहे. 
 
रविवारी रात्री छातीत दुखत असल्याच्या तक्रारीनंतर डॉ. सिंग यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह अनेक नेत्यांनी त्यांच्या उत्तम प्रकृतीसाठी प्रार्थना केली. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती