Satna: 10 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर निर्भया प्रमाणे सामूहिक अत्याचार,आरोपींना अटक
शनिवार, 29 जुलै 2023 (18:09 IST)
मध्य प्रदेशातील सतना जिल्ह्यात दिल्लीतील निर्भया घटनेसारखी घृणास्पद घटना समोर आली आहे. आरोपींनी 10 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे.
दिल्लीतील प्रसिद्ध निर्भया घटनेप्रमाणे सतना जिल्ह्यात एका 11 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार झाला आहे. जिल्हा मुख्यालयापासून 60 किमी अंतरावर असलेल्या मैहरजवळील एका गावात एका अल्पवयीन मुलीवर टेकडीवर नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. बलात्काराची घटना घडल्यानंतर आरोपींनी अल्पवयीन मुलीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये लाकूड टाकले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेली पीडित मुलगी शुक्रवारी सकाळी घरी पोहोचली तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. यानंतर मुलीच्या कुटुंबीयांनी तिला पोलीस ठाण्यात नेले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही आरोपी मंदिर व्यवस्थापनात रोजंदारीवर काम करतात. मुलीच्या शरीरावर चाव्याच्या अनेक खुणा आहेत. मुलीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये काठी टाकल्याची बाबही समोर आली आहे. मुलीच्या शरीरावर चाव्याच्या अनेक खुणा आहेत. मुलीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये काठी टाकल्याची बाबही समोर आली आहे.
रवींद्रकुमार रवी आणि अतुल भडोलिया अशी आरोपींची नावे आहेत. दोघांचे वय 30 वर्षे आहे. दोघांना शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता, तेथून त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
या घटनेनंतर मंदिर व्यवस्थापनाने दोघांनाही नोकरीवरून बडतर्फ केले आहे. आरोपींमुळे मंदिराची प्रतिमा मलीन झाली आहे .आरोपींपैकी एक मंदिर समितीच्या गोशाळेचा सुरक्षा रक्षक आहे, तर दुसरा वेदशाळेत शिपाई आहे.
या घटनेने दिल्लीतील 2012 च्या निर्भया प्रकरणाची आठवण करून दिली. माजी मुख्यमंत्र्यांनी ट्विट केले आहे की, मध्य प्रदेशात बहिणी आणि मुलींसोबत अशा घटना सातत्याने घडत आहेत. मुलीवर चांगले उपचार आणि एक कोटी रुपयांची आर्थिक मदतीची मागणी त्यांनी केली आहे.