दिल्लीतील पराभवाच्या भीतीपोटी राम मंदिर ट्रस्टची घोषणा : ओवेसी
गुरूवार, 6 फेब्रुवारी 2020 (15:56 IST)
एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी दिल्लीतील पराभवाच्या भीतीने भाजपने राम मंदिर ट्रस्टची घोषणा केली आहे असे म्हटले आहे. तर काँग्रेसने पंतप्रधान मोदींवर मतांची शेती करीत असल्याचा आरोप केला आहे.
ओवेसी म्हणाले, संसदेचे अधिवेशन 11 फेब्रुवारी रोजी संपत आहे. तसेच दिल्लीत 8 फेब्रुवारीला मतदान होत आहे. त्यामुळे यानंतर ही घोषणा करता येऊ शकली असती. या घोषणेच्या वेळेवरुन असे वाटते की भाजप दिल्लीच्या निवडणुकीवरुन चिंताग्रस्त झाली आहे.