सध्याच्या कायद्यात 'लव्ह जिहाद' सारखी काही टर्मच नाही. 'लव्ह जिहाद'ची परिभाषाच नाही आणि 'लव्ह जिहाद'शी संबंधित एकही प्रकरण सरकारपर्यंत आलेले नाही, असा खुलासा केंद्रीय गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनी केला. लोकसभेत एका लेखी प्रश्र्नाला उत्तर देताना रेड्डी यांनी हा खुलासा केला आहे.