भारतीय रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. आता रेल्वेनं प्रवाशांच्या सुरक्षेसाठी यापुढे रेल्वे गाड्यांमध्ये विमानांप्रमाणेच ब्लॅक बॉक्स बसविले जाणार आहे. ब्लॅक बॉक्स असलेल्या रेल्वेच्या डब्ब्यांचं अनावरण रायबरेलीतील रेल कोच फॅक्टरीमध्ये करण्यात आलं आहे. रेल्वे गाड्यांमधील ब्लॅक बॉक्स अपघात रोखण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. या प्रकारची सुविधा ही विमानामध्ये असते, नेमके अपघात होतांना काय घडते त्याची माहिती यामध्ये संग्रहित होते. त्यामुळे अनेक अपघात रोखता येणार आहेत.