रेल्वे मंत्रालयाकडून दांडीबहाद्दर कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई

रेल्वे मंत्रालयाकडून आता दांडीबहाद्दर कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई  केली जाणार आहे. याप्रकरणात अधिकृतपणे न कळवता दीर्घकाळ रजेवर असणारे असे तब्बल १३,५०० कर्मचारी भारतीय रेल्वेत आढळून आलेत.

याआधी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी अधिकाऱ्यांना अशा दांडी बहाद्दर कर्मचाऱ्यांना शोधण्यासाठी एक व्यापक मोहीमच घेऊन त्यांची यादीच बनवायला सांगितली होती. त्यानुसार रेल्वेच्या 13 लाख कर्मचाऱ्यांपैकी तब्बल 13, 500 कर्मचारी भारतीय रेल्वेत आढळून आलेत.

या सर्व दांडी बहाद्दरांवर निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश रेल्वे मंत्र्यालयाने दिलेत. त्यामुळे या दांडीबहाद्दरांवर आता कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती