मोदींच्या परवानगीशिवाय रिपोर्ट बदलणे असंभव

शनिवार, 15 सप्टेंबर 2018 (11:34 IST)
भारताला 9 हजार कोटींचा चुना लावून पळून गेलेला विजय मल्ल्याने पळून जाण्यापूर्वी आपण अर्थमंत्री अरूण जेटली यांची भेट घेतल्याचा गौप्यस्फोट केला होता. त्यानंतर आता सीबीआयने परस्पर लूक आऊट नोटिसीत बदल करुन मल्ल्याला पळून जाण्यास अप्रत्यक्षपणे मदत केल्याचा आरोप विरोधी पक्ष करत आहेत. 
 
सीबीआय लूक आऊट नोटीसमधील बदलावरून काँग्रेसचे अध्यक्ष राहुल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जेटली यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. राहुल यांनी यावेळी मल्ल्या पळून जाण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदीच कारणीभूत आहेत. सीबीआयही थेट पंतप्रधानांना रिपोर्ट करते त्यामुळे मोदी यांच्या परवानगीशिवाय  ते पळून जाऊच शकत नाही. पंतप्रधानांवर असा थेट आरोप राहुल यांनी केला आहे. यामुळे सर्व भारतीयांचा अपमान झाला असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती