डॉल्बी, डीजेला परवानगी नाही

शनिवार, 15 सप्टेंबर 2018 (09:38 IST)
गणपती विसर्जना दिवशी अर्थात अनंत चतुर्थीला डॉल्बी आणि डीजेला परवानगी मिळणार नसणार आहे. सरकारने जुलै २०१७ मध्ये डॉल्बी आणि डीजेवर बंदी घातली होती. या बंदी विरोधात ऑडिओ आणि लाईटनिंग असोसीएशनने याचिका दाखल केली होती. ही याचिकेवर  उच्च न्यायलयात सुनावणीसाठी आली असतांना कोर्टाने यावर तत्काळ बंदी उठवण्यास नकार देत १९ तारखेपर्यंत सरकारला यावर उत्तर देण्यास सांगितलेले आहे. 
 
सुनावणी दरम्यान याचिकाकर्त्यांनी डॉल्बी आणि डीजेवर बंदी बंदी का? लाइव्ह कॉन्सर्ट आणि ताशा ढोलमुळेही आवाज होतो मग आमच्यावर बंदी का? असा प्रश्न उपस्थित केला. सरकारने बंदी घालतांना उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे बंदी घातली असल्याचे सांगितले आहे. पण न्यायालयाचे अशाप्रकारचे कोणतेही निर्देश नसल्याची बाजू याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी उच्च न्यायालयात मांडली. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती