नोकरीचे आमिष दाखवून नागपूर येथील युवकाशी अनैसर्गिक कृत्य करण्याऱ्या बिल्डरवर गुन्हा

मंगळवार, 11 सप्टेंबर 2018 (17:14 IST)
नौकरीचे आमिष दाखवून नागपूर येथील युवकाशी अनैसर्गिक कृत्य करण्याऱ्या बिल्डर व त्याच्या अन्य एका साथीदारावर वणी पोलिसांनी गुन्हा नोंद केल्याने खळबळ उडाली आहे. गुन्हा नोंद होत असल्याची माहिती बिल्डरच्या साथीदाराला मिळताच नागपूरातील राजकीय वजन वापरून गुन्हा दडपण्यासाठी शर्तीचे पर्यंत केले.
 
नागपूर येथील 24 वर्षीय युवकाची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने त्याला नौकरीची नितांत गरज होती नागपूर येथील एका इसमाने त्याची बिल्डर योगेश पंजाबी याचे सोबत भेट करून नोकरी मिळून दिली. 25 हजार रुपये पगार ठरविण्यात आला. दि 7 जुलै 2017 ला बिल्डरने आपल्या वाहनात बसून त्या युवकाला वणी येथे आणले. छोरिया लेआऊट गणेशपूर येथील आर्यन हेरिटेज या बिल्डिंग मधील एका सदनिकेत नेले. आधीच मद्यप्राशन अवस्थेत असलेल्या बिल्डरने त्या युवकाला पकडले व त्याच्याशी अश्लिल चाळे सुरू केले. युवकाने विरोध केला असता याच कामाचे 25 हजार पगार तुला देत असल्याचे सांगून कपडे काढून रहा असे म्हणून बिल्डर बाथरूम मध्ये गेला. हीच संधी साधून त्या युवकाने तिथून पळ काढला घडलेला प्रकार त्याने नागपुर येथील बिल्डरच्या मित्राला सांगितला असता त्या बिल्डरच्या मित्राने तू याची कुठेही वाच्यता करू नको नाहीतर  जीवानिशी जाशील अशी धमकी दिली. संबंधित बिल्डरचा मित्र हा नागपूर येथील राजकीय नेत्यांच्या जवळील असल्याने हे प्रकरण पोलीस ठाण्यात आल्यानंतर नागपूर येथून दडपण्यासाठी मोठे प्रयत्न करण्यात आले. युवक प्रचंड घाबरला तब्बल 14 महिन्या नंतर बुधवार (दि. 5 ) युवकाने वणी पोलिसात तक्रार दाखल केल्याने वणी पोलिसांनी बिल्डर योगेश पंजाबी व त्याच्या साथीदारावर गुन्हा नोंद केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक खाडे करीत आहे

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती