मोदी सरकारचा निर्णय-आता रेशनच्या दुकानात वीज,पाण्याची बिले भरता येईल

बुधवार, 22 सप्टेंबर 2021 (14:22 IST)
मोदी सरकारच्या अन्न पुरवठा मंत्रालयाने एक निर्णय घेतला आहे.या नवीन निर्णयानुसार आता रेशनच्या दुकानात ग्राहकांना वीज,पाणी,आणि इतर सुविधा बिले भरण्याची सुविधा मिळणार आहे.या साठी अन्न पुरवठा मंत्रालयाने सीएससी इ-गव्हर्नन्स सर्व्हिस इंडिया लिमिटेड शी एक करार केला आहे.या करारावर सार्वजनिक पुरवठा उपसचिव आणि सीएससीचे उपाध्यक्षांनी स्वाक्षऱ्या केल्या आहे.
 
या करारामुळे रेशन धान्याच्या दुकानातून केंद्र सरकारकडून राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत गरिबांना कमी किमतीत धान्य पुरवले जाते.आता याचा माध्यमातून नागरिकांना सुविधा मिळणार आहे.या मुळे दुकानदारांनाही नवीन व्यवसाय मिळू शकेल. 

या करारानुसार-आता रेशनच्या दुकानात वीज,पाणी बिल भरण्या सह पॅन कार्डासाठी आणि आधारकार्डासाठी अर्ज दाखल करण्याची मुभा देखील मिळणार आहे.
निवडूक आयोगाशी निगडित सुविधा देखील उपलब्ध केल्या जातील.हा करार ग्राहकांच्या सोयीसाठी केला आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती